आमच्या बद्दल

Company about

संपुर्ण भारतात प्रसिध्द असलेल्या षिर्डीच्या श्री साईबाबा मंदिरानंतर प्रतिषिर्डी म्हणून ज्या मंदीराकडे लाखो भक्त पाहातात ते मंदीर म्हणजे, महाराश्टाच्या उपराजधानीतील प्रसिध्द श्रध्दास्थान श्री साईबाबा मंदीर आहे. मंदीरात प्रवेष करताच षिर्डिच्या साईमंदीराचा आभास होतो. हे मंदीर नागपूर षहरातील वर्धा रोड वर प्रषस्त जागेत वास्तुषास्त्राप्रमाणे बांधण्यात आलेले आहे. श्री साईबाबांची मुर्ती षुभ्र संगमरमरीची असून मुर्तीकार स्व. हरीष तालीम, गोरेगाव, मंुबई हे आहेत. याच कुटंूबाने षिर्डीची श्री साईबाबांची मुर्ती घडवलेली आहे.

श्री साईबाबाच्या मुर्तीची प्राणप्रतिश्ठा दत्तजयंतीच्या षुभ मुहूर्तावर दि. 03/12/1979 ला साकोरीच्या पुज्य गोदावरी माताजी यांच्या षुभहस्ते विधिवत करण्यात आली होती. याप्रसंगी सिनेक्षेत्रातील प्रसिध्द व्यक्ती, उद्योगपती व राजकीय पुढारी अनेक धार्मीक संस्थेचे प्रतिनीधी व हजारो भक्तजण उपस्थित होते. हे मंदीर उभारण्याचे प्रेरणा स्थान नागपूरातील प्रसिध्द साईभक्त बालयोगी श्री विजयबाबा कोंडा होय. हे भव्य मंदीर उभे करण्यात ज्या ज्या महानुभवाचे योगदान आहे त्या सर्वांची नावे येथे नमुद करणे षक्य नाही त्याबद्दल क्षमस्व. विजय बाबा कोंडा, पंडित भीमसेन जोषी, स्व. एन. के. पी. सावळे, दिलीप कुमार, श्री ष्यामकुमार श्रीवास्तव, श्री बाबुलालजी बरथे, श्री ताराचंजी निपाने, श्री नारायणदास सराफ, श्री राणा हनुमानसिंग, श्री खुषालचंद पिंचा, प्रसिध्द सिनेस्टार धमेंद्र, हेमामालिनी, श्री लक्ष्मणराव भोयर, सौ. प्रमिलाताई उत्तरवार, श्री संत गुलाबबाबा ही त्यापैकी काही नावे आहेत.

सर्व भक्तांना ज्ञात आहेच कि षिर्डीचे जगप्रसिध्द श्री साईबाबाचे मंदिर गर्भश्रीमंत, उच्चषिक्षित बॅरिस्टर स्व. गोपाळराव बुटी यांनी बांधलेले आहे. फक्त मंदिर बांधूनच ते थांबलेले नाही, तर 10-11 वर्शे त्यांनी प्रत्यक्ष श्री साईबाबांच्या सेवेत घालवली. ज्यांच्या लक्ष्मी व सरस्वती प्रसन्न होत्या असा संगम फार क्वचीत भक्तामध्ये आढळलो. इंग्लंड येथे बॅरिस्टरची पदव प्राप्त करूनही ज्यांच्या पायाषी सुखसोयी लोळण घालत असतांनाही त्याला झुगारून स्व. गोपाळराव बुटी षिर्डीला श्री साईबाबा समाधिस्त होईपर्यंत त्यांच्यासेवेत तल्लीन राहीले. अषी ही पुण्यवान व्यक्ती नागपूरची आहे, हे नमुद करतांना गर्व - अभिमान वाटतो.

दानपेटी / पेट्या, सी. सी. टी. व्ही., कॅमेरया समोरच सील तोडून उघडण्यात येतात. पेटीतील रक्कम मोजतांना विष्वस्त मंडळातील कर्मचारी, भक्तगण उपस्थित राहतात. दान पेटीतील रक्कम त्याच दिवषी बॅंकेत भरली जाते. दुसरया दिवषी दानपेटीतुन आलेली रक्कम, सोने, चांदी मंडळाच्या सुरक्षिततेच्या दुश्टीकोनातुन मंडळात 49 सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. मंडळात प्रवेष करतांना सुरक्षा गार्डकडून हॅण्ड मेटल डिटेक्टरद्वारे भक्ताजवळ असलेल्या बॅग, सुटकेस तपासल्या जातात. महत्वाच्या कर्मचारयाजवळ वाॅकी-टाॅकी देण्यात आलेले आहे. अ. धर्मार्थ कामांसोबतच मंडळ सामाजिक बांधिलकी जपते. नागपूर जिल्हयात ज्या धर्मार्थ संस्था आहेत. उदा. अंध, अनाथालय, मूक बधीर, अपंग, वृध्दाश्रम, परीत्यागीत महिला आश्रम इत्यादींना मंडळातर्फे दर महिन्यात 100 किलो तांदूळ व वेळप्रसंगी गहू असे ध्यान्य देण्यात येते. ब. मंडळातर्फे दि. 02/07/2015 ला सुसज्ज रूग्णवाहिका इंदिरा गांधी षासकीय महाविद्यालय व रूग्णालय यांना भेट देण्यात आलेली आहे. गुरूवारला महाप्रसाद वाटप करण्यात येणारया प्रसादालायाच्या जागेचे नुतनीकरण करून सुषोभित करण्यात आलेले आहे.

मंदिराचे लोकेषन

Company about

श्री साई मंदिर हे वर्धा रोड वर छत्रपती पुलाजवळ रोडवर असुन रेल्वे स्टेषन पासून अंदाजे 7 कि.मी. तर मध्यवर्ती बस स्थानक, गणेषपेठ येथुन अंदाजे 6 कि.मी. तर विमान तळापासून अवघ्या 4 कि.मी. अंतरावर आहे. तसेच या ठिकाणहून टॅक्सी, आॅटो, बस या सहज उपलब्ध होउ षकतात.

देणगी कक्ष

Company about

मंदिरात दोन पाळीत 2 देणगी कक्ष असून सकाळी 6.00 ते 2.00 व दुपारी 2.00 ते रात्री 10.00 पर्यंत देणगी कक्ष कार्यरत असून त्याठिकाणी नगदी देणगी, धान्य व इतर वस्तू स्विाकारल्या जातात आणि आॅनलाईन देणगी स्विकारण्याची सोय करण्यात आली आहे.Board of Members

about

Shri. Omprakash Yadav

President

Shri. Avinash Shegaonkar

Secretary

Shri Rajendra Deshmukh

Treasurer

Contact Us

LOCATION : Wardha Road, Nagpur
0712 768622115

FOLLOW US

short